STORYMIRROR

Aruna Garje

Others

2  

Aruna Garje

Others

आला आषाढ...

आला आषाढ...

1 min
79

आला आषाढ महिना

संगे पावसाच्या धारा

झेलू ओंजळी पाऊस 

झोंबे अंगा गार वारा 


गर्दी आकाशी ढगांची

भारी गडगड त्यांची

कशी कडाडे बिजली

धडधड ह्रदयाची


चिंब भिजताती झाडं 

सळसळ ती पानांची 

गळे थेंब थेंब पाणी

टपटप ती थेंबाची


दाट हिरवी ती झाडी

पानाआड दडे कळी

हळू हळू उमलते

तिची एकेक पाकळी


चाले लगबग भारी 

भोळ्या भाबड्या भक्तांची

आस आषाढीत त्यांना

पांडुरंग दर्शनाची 


हाती झेंडा नि पताका 

ठेका टाळ मृदंगाचा 

मुखी चाले जयघोष 

फक्त विठ्ठल नामाचा 


आषाढीत दुमदुमे

जेव्हा पंढरी नगरी

गाभाऱ्यात विठू उभा

त्याचे लक्ष भक्तांवरी


असा आषाढ महिना 

चिंब भक्तीत भिजला

कधी भेटेल मजला

माझा विठ्ठल सावळा


Rate this content
Log in