आला आला ऋतू वसंत
आला आला ऋतू वसंत
1 min
38
आला आला ऋतू वसंत
जीवनी घेऊन नवरंग
हिरवी पालवी झाडाला
घेऊन येतो आनंद संग
चैत्र फाल्गुन मासी
वसे ऋतुराज धरती
त्याच्या उष्ण थंडाव्यांने
पावन होते ही माती
नवलाईचा हा नवऋतू
नाविन्याने गं नटे
दृश्य डोळ्याला भावते
जनू ऋतू वसंत हसे
शेतातील पिके मंद
हवेमध्ये डोलतात
रात्रीचे चांदणे शितल
लपंडाव खेळतात
मोहोर आंब्याचा पाहून
गीत कोकिळा गाते
आजा आला ऋतू वसंत
नवलाईचे घेऊन पोते
