आला आला रे श्रावण
आला आला रे श्रावण
1 min
146
आला आला रे श्रावण
शंभू देवाचे कराया पूजन
देवाला आवडते बेलाचे पान
वाहतात होती दूर ते विघ्न
आला आला रे श्रावण
श्रावणातील ती कोवळी किरणा
स्वच्छ निर्मळ करती सर्वांचे मन
फुलांचा तो सुगंध दरवळत
पक्षाचे गाणे वाटे स्वजवळ
एकूण वाटे मन प्रसन्न प्रसन्न
आला आला रे श्रावण
प्राणीही घेती श्वास मोकळा
गाती नाचती लावती जिव्हाळा
बायका करते सोमवारी उपवास
पूजा नैवेद्य त्यांचा समावेश
घरात अगरबत्तीचा सुवास
सर्व परिसर वाटे प्रसन्ना प्रसन्ना
आला आला रे श्रावण
