आकर्षण
आकर्षण


आकर्षण मज बुध्दीचे
त्यावर जिंकू जग हे सारे
नकोत उनी धुनी मग कुणाची
फक्त आम्ही भक्त मावळे
आकर्षण मज नाविण्याचे
भुलवून या मनाला...
चल मग हळूच शोधूया
फुलातील पराग कणाला...
आकर्षण मज देवाचे
देवाला अकर्षण भक्तीचे
देई तोच साथ नेहेमी
कुणी करू नका चुकी युक्तीने
आकर्षण मज समीप भासे
कधी शेतकरी भावनेने रडे
माझ्या ही मनात शंका येते
का जातसे त्याच्या मनाला तडे
आकर्षण असो
नभापरी त्या
लोचट भावना
काही नको त्या
आकर्षण मज
विठ्ठलाचे स्मरण
मन होते प्रसन्न
होता सावळ्या चे दर्शन
आकर्षण मज
मावळ्यांचे सैन्य
देशासाठी लढले
शूरवीर आमचे
आकर्षण मज त्या भू मातेचे
देशाच्या त्या वीर जवानांचे
आयुष्य पणाला लावले त्यांचे
भारत मातेच्या देवतांचे
आकर्षण मज त्या बाळाचे
लखलखते ते डोळे तीचे
अनमोल चिमुकली बाहुली
असे वाटे त्यास सगळेच तिचे
आकर्षण मज वाटे
त्या नाव वधूचे
सोडूनी तिचे भूतकाळ
नव्या नात्यानं सांभाळून घेण्याचे.
आकर्षण मज त्या देहाचे
आई बाबांनी घडविले माझे
मलाच मानते सोन्याचा साज
मीच माझी मनात लाजे
आकर्षण मज संसाराचे
किती आपण अडकावे?
संसाराची मोहमाया सोडून
देवाच्या सहभागीतेत रमावे
आकर्षण मज भारी वाटे
सांगितल्या रंगांचे
वाजवत बसते सर्व राग ते
मनात माझ्या मग हर्ष दाटे
आकर्षण मज बागेचे
सखे ग भारी आहे
पानाफुलात मम जीव
अडकून सदैव राहे
आकर्षण मज टिव्ही चे
वाटत होते भारी
आता काव्याच्या छंदाने
बंद केली सर्व सिरियल्स सारी
आकर्षण मज सत्याचे
कारण सत्य मेव जयते
सत्याची सदा कास धरावी
सरतेशेवटी सत्य बाजी मारते
आकर्षण आता मज स्वप्नांचे
दूर कुठेतरी मी जाणार
सुंदर सुंदर फुलपाखरू
कुशीत घेऊन मी निजणार......
कुशीत घेऊन मी नीजनार.......