STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

आकाशाची शिडी

आकाशाची शिडी

1 min
309

आकाशाला शिडी लावू

न्याहाळून  पाहू  रंग

पाहू निसर्ग किमया

मनातून होऊ  दंग ।।१।।


आभाळाची ती निळाई

डोळे भरूनिया पाहू

शांती, समाधानी वृत्ती

असे जीवन बनवू ।।२।।


कोण रंगारी तिथला

काय त्याची कलाकारी

भाग्य त्याचे किती थोर

रंग लावी देवाघरी।।३।।


देवा तुझ्या दुनियेत

सारा सुखाचा गोडवा

माणसाच्या आयुष्यात

सदा होळीचा पाडवा।।४।।


दिले त्याची नोंद नाही

नाही त्याचीच ओरड

हाती आलेले सोडून

नाही साठी धडपड।।५।।


आत आपल्या डोकावू

आत्म निरीक्षण करू

थोडे विचारू मनाला 

कृपा देवजीची स्मरू।।६।।



Rate this content
Log in