आजोबा
आजोबा
1 min
246
जरी असता वृद्ध अपंग
आजोबांची जिद्दच भारी
एक हाती सायकल धरुन
करती वनराईची ही वारी
दुजा हाती आधारासाठी
काठी टेकत निघेच स्वारी
तब्येतीची घेण्या काळजी
आजोबा फिरती राम प्रहरी
जीवनाचा मार्ग होई सोपा
करा व्यायाम चालण्याचा
शरीर मन तंदूरूस्त राहता
प्रकृती स्वास्थ्य राखण्याचा
नातवंडांना खेळविण्याचा
लागे त्यांना असा हा लळा
सायकल चालवित नेताना
शिकविण्याचा छंद आगळा
