STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

4  

Samiksha Jamkhedkar

Others

आजोबा आजी🙏

आजोबा आजी🙏

1 min
873

आजोबा आजी म्हणजे एक

निस्वार्थी प्रेम।

सुरकुतलेला हात पाठीवर फिरवून आत्मविश्वस देणार भावनिक मन।

लहानपणी आई रागावली की 

बिनधास्त आजीच्या मागे लपायच।

तिने आईला खोट खोट ओरडून शांतच बसवायचं।

आजोबा कितीही कडक आणि शिस्तीचे असले तरी ओरडत कधीच नाही अंगावर।

माझ्या बोबड्या आणि प्रेमळ शब्दाने जिंकून घेते त्यांचे मन।

आजोबा आजी करतात लाड

त्यांच्या म्हातारपणी ते आमचे मित्र होऊन आम्हाला जपतात जिवापाड।

त्यांची काठी, चष्मा,आम्ही नातवंड बऱ्याचदा ठेवतो लपवून।

तक्रार न करता आमच्याकडून हळूच घेतात गोड बोलून।

नातं, नातवंड म्हनजे आजोबा आजीची दुधावरची असते साय।

त्यांना सोडून घरातुन 

निघत नसतो त्यांचा पाय

निघत नसतो त्यांचा पाय।


Rate this content
Log in