आजं पुन्हा पावसाशी
आजं पुन्हा पावसाशी
1 min
246
आजं पुन्हा पावसाशी,
मी खूप भांडले होते.
ईतके दिवस कुठे होता?
हे खडसावून विचारंत होते.
मी विचारतांच हा प्रश्न त्याला,
तो हळूच गप्प झाला होता.
अबोल त्या नव्या जगात
तो असा हरवला होता.
अनोळखी त्या जगातून त्याला,
मी अलगदं बाहेर आणले.
ईतके दिवस माझ्याशी न भेटण्याचे,
त्याला कारण विचारले.
मी विचारले असता कारण,
हलकेच त्याने हास्य दिले.
तुझ्याचं कवितांची वाटं पहातं होतो,
असे मला उत्तर दिले...
