STORYMIRROR

Umakant Kale

Others

4  

Umakant Kale

Others

आजीच्या कहान्या

आजीच्या कहान्या

1 min
311

बालमनास भुरळ घालणारे

आजी आजोबा होते कुठे?

नात्याच्या नावावर

तेवढेच माय बाप होते !!


नाही ऐकली भोपळ्याची

कहानी, नाही लबाड लांडगा

आजी आजोबासाठी आम्ही

फक्त होते रे परके कोणी ?


येता बापाची कमाई

खायला त्यांना गोड लागे

त्याच्या मुलांना कधी

पोटासी धरायला त्यांना लाज वाटे


जीवनाची कविता, ही गोष्ट

विधात्याने अशी दाखवली 

माणसाची परख आम्हास

अशी त्याने शिकवली


आटले रक्त, भावना

झाल्या रे पाणी

पडल्यावर जमिनीवर

धरतीनेच साद घातली


काय ठसा उमटणार

नवं फुलच तुम्ही चेंदले

हरवून गेले बालपण

आरोपीच्या पिंजऱ्यात

तुम्हाला उभे करून

ते असे गेले


नाही संपणार हा खटला

अपील देवाकडे

शेवटी करून गेले

शेवटी करून गेले...


Rate this content
Log in