आजीची माया
आजीची माया
1 min
378
नवसाने मागीतलेस मला
पालन पोषण उत्तम केलंस
संस्काराचे बाळकडू पाजून
आजी तू मला सशक्त केलंस
सर्वाना प्रेमाने सांभाळते
वाटतो तुझा खूप आधार
लवकर ये बरी होऊन
तुझ्यावर असे प्रेम अपार
समस्त परिवाराचं चैतन्य तू
आम्हा सर्वांची तू मोठीआई
चल उठ लवकर बरी हो
आली बघ दसरा दिवाळी
फराळ, रांगोळी, दिवे, कंदील
बरीच करायची आहे तय्यारी
कितीदिवस राहणार तिथे तू
ये ना घरी लवकर मोठी आई
तुला ही नसेल करमत ना
काम न करता झोपून राहायला
ये आता नवी ऊर्जा घेऊन
जागं कर पुन्हा या घराला
