STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

आजीची कविता

आजीची कविता

1 min
401

रूप आईन्यात माईना

अशी लेक रूपवती

माझ्या साळूबाईचं

कवतुक करू किती


माझ्या साळुचा आवाज

जणू कोकिळाचं बाई

सा-या फिक्या तिच्या पुढं

रानवेडया जाई जुई


सुख लाभो तिला सारं

माझ्यामनीची ती आस

शब्द पडती अपुरे

माझी साळु लई खास


Rate this content
Log in