आजीचे गाव
आजीचे गाव
छान,छान गाव,आजी,तुझे,
छान छान गाव,
उन्हळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी
मामासंगे कटी, बाबांना पप्पी,
छान,छान गाव,आजी तुझे,
छान छान गाव.
बाबा बाबा चला फेरफटका मारु,
आमराईत जावू,
पाढ लागलाय आंब्याला,
पाड सारे आणू,
चला चला बाबा उशीर नका करु.
छान,छान गाव,आजी तुझे,
छान छान गाव.
हरिणाची उडी,पाहू थोडी, थोडी
आंब्याच्या फांदीला पाडाची कैरी,
मामी आणि आजी येत्याल मागुण,
रान वनात हिंडू थोडी वनराई पाहू,
छान,छान गाव,आजी तुझे,
छान छान गाव.
पक्षी उडतो,भर्कन निळे निळे आकाश,
ससा उडतो पहा कसा,गवतात दडला,
नांगराला जोडी जुंपली,शेत काळे,काळे,
दिवाळीच्या सुट्टीत होईल सारे,हिरवे.
लाडू आणि अनारसा आजीने,केला,
खाऊन घेतले सारे म्हणुन,मामा रागावला,
कान माझा धरला,कानवला कुठे म्हणाला,
शेव पिवळी पिवळी मामीने केली,
किती छान मामी माझी,फटाकडी वाजली.
छान,छान गाव,आजी तुझे,
छान छान गाव..
