STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

आजीचे गाव

आजीचे गाव

1 min
513

शेवटचा पेपर संपला की

बॅग भरलेली असायची

मनाला लागे हुरहूर

ओढ गावाला जायची


मे महिन्याचं रखरखतं ऊन

घामाच्या धारा अंगातून

गावाची वेश गाठताचं

सारा शीणं जाई निघून


वेशीपासून एक मैल चालून

येई माझ्या आजीच गाव

दिसता आम्ही सारे

काळीज तिचे घेई धाव


माणसांनी घर, अंगण गजबजायचं

नातवंडांनी गोकुळ सजायचं

चांदण्यांनी भरलेले आकाशाखाली

गप्पा मारत निजायचं


सूर्य यायचा उठवायला

गोधडीवर ऊन पाडायचा

गार पाण्यानं अंघोळ करून

चुलीवरचा चहा प्यायचा


ऊन्हातान्हा ची पर्वा नाही

गाव पायाखालून काढायचा

झाडाला झोका टांगून

मनसोक्त खेळायचा


कांदा, चटणी, भाकरीची

चव जीभेवर रेंगाळायची

पाटाच्या पाण्याची गोडी

ती काय सांगायची


सूर्य मावळतीला जाता

पावले घराकडे परतायची

दिवस भुर्रकन उडून जायचे

सुट्टी आमची संपायची


डबडबलेल्या डोळ्याने

आजी जवळ घ्यायची

पदराने पुसत डोळे

वेशीपर्यंत मागे यायची


आताही मे महिना आला की

आठवण येते गावाची

मनापासून जगलेल्या

त्या गोड क्षणांची


Rate this content
Log in