आजी
आजी
माझी आजी होती साधी भोळी नेहमी ती गोष्ठी सांगायची .....
परत परत ऐकलेल्या गोष्टी ही ऐकायला तिच्या फार मज्जा यायची .....
तिची ती सांगण्याची पद्धत हि लयबंद असायची .....
मधीच हातवारे करून नाट्यमय रूप हि सादर करायची ...
गोष्ट ऐकताना जणू ती आम्हाला त्या दुनियेची सफर घडवून आणायची ...
अशीच एकदा आम्हाला तिनी आपली कहाणी सांगितली ....
"होते मी लहान वय होते खेळण्याचे
पूर्वी रीत होती लहान वयात बाहुल्यासारखे लग्नात अडकायचे
नव्हती आपल्या ला कुठल्या जबादारीची जाणीव .....
तरीही गेली मी माझ्या सासरी मन एकवटून....
परक्याच्या घरात मानसन्मान जपायचा होता ....
नवरा म्हणजे परमेश्वर त्याची हि काळजी ह्याला हवी होती ....
नव घर नवीन लोक बघून मला रडू येई ....
आईच्या आठवणीने डोळे भरून येई ....
आपल्याला हे सगळं जमेल काय हे प्रश्न डोकयात घुमू लागी .....
आजोबा होते तुमचे माझ्या पेक्षा वयाने मोठे
पण होते ते समंजस नव्या घरात दिला त्यानी मला साथ धीराने
भिऊ नकोस शिकशील तू हळू हळू नेहमी प्रोत्साहीत करत राहिले....
काळ लोटला नव्या जबाबदारी सांभाळल्या...
मुलं बाळांना वाढवलं त्याची लग्न केली ....
पण नशिबाने अर्ध्यावर तुमचे आजोबा मला सोडून गेले ".....
म्हतारपणात त्याची साथ हवी होती असे म्हूणून ती रडू लागली ...
पण तुम्ही नातवंड आहात ना सॊबत म्हणून मला नाही वाटत एकट अस ती बोलून गेली ..
मग मी तिला हसवण्याचा प्रयत्न केला लगेच तिच्या चेहऱ्यावर हसू परतले ....
तो दिवस आणि ती कहाणी नेहमी लक्षात राहिली ...
अशी माझी आजी जाऊन दोन वर्ष पूर्ण होतील
तीची आठवण माझ्या मनात मी आहे जपली
म्हणून तर मन नेहमी म्हणते आजी तू आता हवी होतीस .....
