आजी आजोबांची भेट
आजी आजोबांची भेट
1 min
337
खूप वेळ वाट पाहिलीस
आजी येते आता भेटीस
जप तिला आजोबा प्रेमाने
कफ आहे अजून छातीत
कामाची सवय तिला खूप
संसार काही सुटला नाही
म्हणावं कर थोडा आराम
बस आता शांत एकाजागी नीट
आल्या आल्या आजोबा
तुझ्याशी खूप मारेल गप्पा
अभिमानाने सांगेल तुला
साऱ्या कुटुंबाच्या गाथा
नातसून अन नातजावयाचं
कौतुक खूप ती करेल
नातवंड ही आहेत मजेत
तुला ती भरभरून सांगेल
सुना मुलं तुमची सारी
गुण्यागोविंदाने नांदतात
एकमेकांना ते सगळे
अगदी जीवापाड जपतात
थोडा आराम झाल्यावर
फिरायला तिला घेऊन जा
आता सत्ता तुमची तिथे
पुढील प्रवासा साठी शुभेच्छा
