आजी आजोबा
आजी आजोबा
दादा दादीच्या गोष्टी ऐकायला
नातवंडांचं नशीब लागतं
नाना नानींच्या मांडीवर बसायला
नातवंडांचं नशीब लागतं || 0 ||
आजी आजोबांसाठी दुधावरची
साय असतात नातू नात
सर्वस्व असतात नातवंड जशी
जुन्या पणतीवरची नवी वात
दादा दादीच्या सोबत हसायला
नातवंडांचं नशीब लागतं
नाना नानीच्या हातून खायला
नातवंडांचं नशीब लागतं || 1 ||
सर्वात जास्त लाड करतात
नातवंडांचं आजी आजोबा
आजी आजोबांशिवाय
घरालाही येत नाही शोभा
दादा दादीच्या वर रुसायला
नातवंडांचं नशीब लागतं
नाना नानी सोबत खेळायला
नातवंडांचं नशीब लागतं || 2 ||
