STORYMIRROR

Savita Jadhav

Others

4  

Savita Jadhav

Others

आजही दिसतेस छान

आजही दिसतेस छान

1 min
281

आजही तू दिसतेस छान,

शोभतो अंबाड्यात गजरा,

वय झालं म्हणून काय झालं,

मिळून मनसोक्त जगूया जरा.


म्हातारपण दुसरं बालपण,

दोघांनी मिळून आपण जगूया,

एकमेकांच्या संगतीने

नव्यानं जग हे बघूया.


पाखरं उडाली भुर्रकन,

पंख लावून आशेची,

आपणही करूया हौसमौज,

कशाला कुबडकाठी कुणाची.


प्रेम केलं भरभरून एकमेकांना,

संसारगाड्यात राहून गेलं बोलायचं,

आता मात्र आनंदाने,

फक्त एकमेकांच्या साठी जगायचं.


आपण दोघं राजाराणी,

जुन्या आठवणीत रममाण होऊ,

जुन्या आठवणींना उजाळा देत,

नव्यानं जगण्याची स्वप्न पाहू.


पुन्हा तो हिरवगार मखमली शालू,

नेसून तू आलीस सखे समोर,

लाजून होतील चूर चूर आजही,

तुला बघून आकाशातील तारे, चंद्रचकोर.


Rate this content
Log in