आजच्या युवकांना कष्ट नको करायल
आजच्या युवकांना कष्ट नको करायल
आजच्या युवकांना कष्ट नको करायला
झटपट पैसा कसा पाहिजे मिळवायला
रोज रात्रंदिवस एकच चालू केलंय
तरुणांनी ड्रीम ११ क्रिकेट खेळायला......!
रोज सकाळ-संध्याकाळ एकच डोक्यात असतं
आज कोणत्या संघासोबत असणार संघ
आपण सगळे असतो योग्य पटू निवडण्यात दंग....!
अरे राहुल्या तू कोणत्या संघाला जोडलं
अरे विन्या तू कोणत्या संघाला पैसे लावलं
अरे शुभ्या तू कोणत्या खेळाडूला निवडलं
अरे मंग्या तू काय खेळाडू नवीन लावलं सांग रावं.....
काय सांगू विशाल भावं मी टीम निवडली
काय बोलु परेश राव माझी नियोजन चुकली
कसं बोलू तुला माझी अाख्खी टिम बद्दली
अरे सागऱ्या माझे थोड्याने फिल्डिंग हुकली
अरे अक्षया काय फालतु टीम टॉस जिंकली...
काय रे काय झालं तुझं बनट्या
काय नाय मी लावले पन्नास छोट्या
आता परत नको म्हणतोय टीम लावायला सोन्या
आज्या सांगतोय टीमच्या टिप्स सगळ्या सूर्याला
सारख पैसे लागतायत मोन्याला
निवळ नाद लागला जुगाराचा प्रव्याला.......!
ड्रीम ११च्या जाहिराती पाहून आमिषाला पडायचं बळी
नोकरीच्या ठिकाणी जायचं असेल नाही कोण आपल्या वेळी...
कशाला घरच्या लोकांना पैसे मागून द्याचा त्रास ऐनवेळी
आपलाच बळी घरचेच कानपिळी शेवटी अाळीमिळी गुपचिळी...
आजच्या युवकांना कष्ट नको करायला
झटपट पैसा कसा पाहिजे मिळवायला
रोज रात्रंदिवस एकच चालू केलंय तरुणांनी
ड्रीम ११ क्रिकेट खेळायला......!
