STORYMIRROR

Nalanda Satish

Others

3  

Nalanda Satish

Others

आजच्या काळापुढील प्रश्न

आजच्या काळापुढील प्रश्न

1 min
441

वेळ बदलतो काळ बदलतो

काळा सोबत प्रश्नही बदलतात

आणि बदलतात जगण्याच्या कला 

चरित्र आणि चारित्र्य बदलते

दिशा आणि दशा बदलते

बदलतात जीवनाचे रंग

नवीन विषय नवीन तंत्रज्ञान

नवीन स्वभाव, रक्ताचे बदलतात ढंग

आजच्या काळा पुढील प्रश्न

आगळे वेगळे आणि भयंकर

मोबाईल च्या विळख्यात सापडलेल्या

तरुणाईला भुरळ पडली

वाया जाणारा वेळ दिसत नाही

नोकरीच्या शोधात जातो आहारी नशेच्या

स्वप्न आहेत खूप भरगच्च

होत नाही एकही पूर्ण

विचारांचा होतो भुगा

सैरभैर सुटते मन , असंख्य प्रश्न

प्रशासनाचे भलतेच तेढ

काय करावे काही सुचत

उरतो मद्यप्राशन हा उपाय

खंगते तरुण पिढी प्रश्नाच्या जाळ्यात

वाटा दिसतात खूप पण

गंतव्यस्थान कुठलेच मिळत नाही

नाना तऱ्हेच्या समस्यांनी

डोकं विक्षिप्त व्हायची वेळ येते

उमेद संपते जीवनाची

अपयशाची शिदोरी डोक्यावर असते

असले कितीही प्रश्न तरी

सकारात्मक विचार करावा नेहमीच

स्वाभिमान आणि प्रयत्नाची पराकाष्ठा

दुःख ना लागेल वर्मी


Rate this content
Log in