आजच्या काळापुढील प्रश्न
आजच्या काळापुढील प्रश्न

1 min

484
तंत्रज्ञानाच्या युगामुळे
माणसातील माणुसकी हरवली
जुन्या चाली रीती सारे
विज्ञानाच्या प्रगतीने बुडाली......
प्रत्येकाच्या हातात
दिसत आहेत सेलफोन
वेळ नाही कुणालाच
भेटून बोलाव दोन शब्द गोड.....
मोबाईलच्या वापरामुळे
पोरं झाले खूप हट्टी
मैदानी खेळापेक्षा मोबाईलशी
पोरांची जास्तच गट्टी......
लहान असो का थोर आजच्या
काळापूढे मोबाईलचे प्रश्न झाले मोठे
नाती गोती नकोय कुणाला
मोबाइल पुढे सारे वाटतात छोटे.....