आजच्या काळापुढील प्रश्न गर्दी
आजच्या काळापुढील प्रश्न गर्दी
1 min
252
गर्दी गर्दी गर्दी
गर्दी झाली सारीकडे
इथे तिथे अनं तिकडे
झाली मुंग्यांचाही पलीकडे
सरकत सरकत पुढे पुढे
ही जन्मापासून सवय जडे
इष्टस्थळी पोहोचण्या साकडे
घालती सारे देवाकडे
सारे गर्दीचे भागं बापडे
नाही कुणाला तिचे वावडे
यातच कुणी पडे धडपडे
कुणा न वेळ पहाया त्याकडे
विखुरती सारे चोहीकडे
जो तो गर्दीचे बोट पकडे
वहात जाती अपुल्या ध्येयाकडे
न कळे परततील का घराकडे
जाणार कुठे गर्दीचे हे आकडे
लोटती नित्य या शहराकडे
विषण्ण वाटे पाहुनी या स्थितीकडे
प्रचंड गोल गर्दीचा चालून येईल अपुल्याकडे
