STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

आजच्या काळा पुढीलप्रश्न...!

आजच्या काळा पुढीलप्रश्न...!

1 min
347

आज उद्या परवा

काल गणना होत असते

भूत, वर्तमान, भविष्य 

जीवन घडवत असते...


प्रश्न अनेक पडतात

सहज सुंदर जीवन जगताना

वेगळेच इस्पित गवसते

उत्तरे शोधताना .....


काळा पुढील, काळा मागील

असे काही नसते

प्रश्न प्रश्नच असतात

उत्तर कधीच स्थिर नसते...


आजचे खरे प्रश्न

उद्याचा भविष्य काळ असतात

कधी कधी आजचे प्रश्न

कालचे उत्तरही असतात....


सत्य सत्य असते

असे आपण नेहमीच म्हणतो

पण सत्य साक्षेपी असते

हे आपण कोठे जाणतो....


 म्हणून


आजच्या काळा पुढील प्रश्न

फक्त एकच आहे

आज कालचा प्रश्न

उद्याचे उत्तर आहे का.....?


Rate this content
Log in