आजची ती
आजची ती
1 min
201
आजची ती
आधुनिकतेची चादर पांघरलेली
अन खोल मनात अजूनही
जुन्याच विचारांनी बुरसटलेली
आजची ती
वेगाने पुढे जाणारी
अन तिच्यातल्या तिला
हळूच मागे खेचणारी
आजची ती
खूप आनंददायी वाटणारी
दुःख मनात लपवून
आत्मविश्वासाने जगणारी
आजची ती
निर्ढावलेली निर्धास्त
मोकळ्या वातावरणात
गुदमरलेला श्वास
