आजची कन्या
आजची कन्या
सृष्टी ने आई-वडिलाला दिले अनमोल वरदान,
दानत- दान सर्वश्रेष्ठ मानले जाते कन्या दान.
क्रांतिसूर्य ज्योतीबाने केले कार्य महान,
मुलींच्या शिक्षणासाठी पत्नीला दिले अक्षरज्ञान.
प्रथम महिला शिक्षिकाचा मिळाला सावीत्रीला सम्मान,
तीच्या अथक प्रयासाने सर्व मुलींना मिळू लागले शिक्षण.
सावीत्रीच्या कार्याने रचले गेले नविन किर्तिमान,
पुरुषाच्या तोडिने महिलांचे सर्वक्षेत्रात भरीव योगदान.
कुटुंबाच्या आर्थीक तंगीचे मुली करतात निराकरण,
ऑटो,ट्रक, बस, ट्रकटर रेल,विमान सारखे चालवतात वाहन.
भारतीय मुलींना आहे आपल्या सेनाचा अभिमान,
देश सेवे साठी सैन्य मध्ये आता त्यांचे होते चयन.
वैद्यकीय,यंत्रशास्त्र, औषधीशास्त्र ,वैज्ञानिक संशोधन,
अंतरिक्षविज्ञान,राजनीति मध्ये मुलीचें योगदान.
देशाचे अर्थ खाते सांभाळता श्रीमती सीतारमण,
श्रीमती इंदिरा गांधी होत्या देशाच्या महिला पंतप्रधान.
