Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Others

4  

Chandan Pawar

Others

आजची" गीता"

आजची" गीता"

1 min
515


तरुण भारत- केसरी- मराठा

जागीच पडली आहेत;

अन सिनेमाची पुस्तके

खिशात डोकावत आहेत.


सीत- सावित्री- अहिल्या

पुराणातील वांगी आहेत,

कैतरिना, सोनाक्षी, दीपिका

यांचा मात्र जप आहे.


धोती-बंडी-फेटा

यांना कुठे प्रवेश आहे?

कोट-टाय,सूट-बूट

यांनाच पहिली सलामी आहे.


अभंगवाणी-ज्ञानेश्वरीचा

आता कुठे काळ आहे?

अहो, आमच्या डोक्यात

डिस्कोची गाणी आहेत.


अभ्यास करायला वेळ नाही

शॉर्टकट्चा काळ आहे;

टेक्स्ट बाजारात मिळत नाही

गाईडचा मात्र सुकाळ आहे.


बापूजींची शुद्ध खादी

हिला कुठे मागणी आहे?

टेरिलीन-टेरीकॉट यांचा

सर्वत्र सन्मान आहे.


गीता-वेद-उपनिषदे

सारे सपाट आहेत;

"आय लव्ह यु" हे

मात्र तोंडपाठ आहे.


अहो, तुम्ही म्हणाल

ही काय कविता आहे?

देवाशपथ सांगतो, हीच

आजची" गीता" आहे.


Rate this content
Log in