आजचा विषय- सौंदर्य/फॅशन
आजचा विषय- सौंदर्य/फॅशन
1 min
460
सजली होती परी राणी
फॅशन करूनी भरपूर
सौंदर्य साजरे गोजिरे
काजळाने बदलला नूर
जमाना बदलला आता
फॅशनचा आलाय पूर
सौंदर्याच्या नावावरती
पैशाचा झालाय धूर
हल्ली करूनी फॅशन
बहकलीत ही पोरंपोरी
पैशापरी पैसा खर्च होतो
पोरं वाटतात ही टपोरी
हुरळून जाती सौंदर्याला
चर्येचा नकली मुखवटा
नका भुलू वरच्या सोंगा
रूपाचा आहे फुगवटा
