आजचा विषय - नातं मैत्रीचं
आजचा विषय - नातं मैत्रीचं
1 min
219
नातं मैत्रीचं तुझं माझं
जमलाय मैत्रीचा मेळ
सखी तूच माझी मैत्रीण
खाऊया एकत्रच भेळ
राहू दोघी एका जीवाने
प्रेममाया देऊ आणि घेऊ
जिव्हाळ्याचे नाते आपले
प्रेमद्विप मैत्रीचाच हा तेवू
बोल प्रेमाचे बोलूया सखी
नको मैत्रीत काही खोडा
गुंफू माळ अतूट या मैत्रीची
नाती मैत्रीचीच सारे जोडा
फुलवू या हे नातं मैत्रीचं
पसरू दे सुगंध युगांतरी
कळू दे मैत्र मनामनातील
सर्व मानवांना वसुंधरेवरी
