आजचा विषय- माझा बाप शेतकरी
आजचा विषय- माझा बाप शेतकरी
1 min
444
बाप माझा बळीराजा
दुष्काळाची त्याला सजा
भेगाळली भुई सारी
बळीराजा चिंता करी
पर्जन्याची नसे छाया
काळी आई देई माया
येवू देत मृग सरी
तापे ऊन डोईवरी
रानामध्ये बीज पेरी
कर्जापायी येई दारी
बळीराजा धास्तावला
पर्जन्याला आसावला
कसे पोसू कुटुंबाला
काय सांगू लेकराला
नको असा व्यर्थ रडू
धीर आता नको सोडू
होईल ही धरा ओली
जलधारा येता खाली
आले फुटू आता कोंब
न्हाऊ देत धरा चिंब
