STORYMIRROR

Bharati Sawant

Others

3  

Bharati Sawant

Others

आजचा विषय - कन्यादान

आजचा विषय - कन्यादान

1 min
310

नका मारू

आईच्या पोटात मुलीला

येऊद्या जन्माला

कन्येला


पुण्य कन्यादानाचे

बेटी धनाची पेटी

राबते कुटुंबासाठी

अविरत


घराची वंशवेल

ताई म्हणेल कुणाला

जपेल भावाला

प्रेमस्वरूप


शिकून सवरून

वाढविल घराण्याचा मान

करू सन्मान

लेकीचा


संसाराचे सुख

स्त्रीकडूनच असते येणे

प्रेमाचे लेणे

पारिवारिक


साहित्याला गुण द्या
लॉग इन