आजचा विषय -गुरूचे महत्व
आजचा विषय -गुरूचे महत्व
तेजोनिधी व्योमरूपी
गुरुमाऊली तू माझी
बहरवली ज्ञानसंपदा
आयुष्यभर ऋणी तुझी
सर्वगुणसंपन्न बनविलेत
भरली ही ज्ञानाची झोळी
ओंजळीने वेचले ज्ञान मोती
आम्ही शिकवणीच्या वेळी
सरनोबत नाव लावुनी तुम्ही
प्रवेशला माझ्या विद्यामंदिरी
नाही राखले हातचे काहीच
वाटली ज्ञानाची ही शिदोरी
नाट्यवाचन समूहगीत गीताई
सर्व स्पर्धांमध्ये सामील केले
प्रेरणास्त्रोत बनुनी नित्य मला
गुरुमाऊलीने ज्ञानसंपन्न बनवले
जीवनभर जपीन हृदयात मी
आपले ज्ञान आणि शिकवण
मनात माझ्या केलीय तुमच्या
उपकारांची तुमच्या साठवण
