STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

आजचा विषय- एक आठवण

आजचा विषय- एक आठवण

1 min
257

आज आली एक आठवण

बालपणींच्या मस्त गमतींची

खेळायचो नानाविध खेळही

अल्लड अवखळ संगतींची


चिंध्यांचा चेंडू लाकडी फळी

गल्लीतली ती क्रिकेट कबड्डी

आट्यापाट्या आणि लपाछपी

अंगात असायची फाटकी चड्डी


पार्टी असायची कांदयाचीभजी

चव त्याची न्यारीच वाटायची

पिझ्झा पास्ता बर्गर चायनीज

आवड निवड काहीच नसायची


खावेप्यावे खेळुन मस्त हुंदडावे

जीवनाचे ध्येयच नव्हते ठरलेले

शाळेत जावे नि अभ्यास करून

निष्पाप निरागस जीवन उरलेले


कचकड्याच्या गोट्या विटीदांडू

स्वस्तातलीच असायची खेळणी

शाळेच्या दप्तरात त्या सापडता

खायचो बाबा नि सरांची बोलणी



Rate this content
Log in