आजचा क्षण
आजचा क्षण
1 min
439
आज आहे माझा जगुनी जरा घेऊ दे,
उद्याच्या वाट्याला थोडा क्षण ठेऊ दे,
माझ्या जवळ आजची वेळ आहे
आज त्याला जगायचं आहे ,
उद्याच्या आनंदात आजचा अमूल्य वेळ साठवायचा आहे ।।
येईल क्षण आनंदाचा उद्याही
आज तू वेळेचा आदर कर ,
बहरेल प्रत्येक क्षण उद्याही कारण
आजची वेळ ही तुझी आहे ।।
