STORYMIRROR

suvidha undirwade

Others

4  

suvidha undirwade

Others

आजचा दिवस.

आजचा दिवस.

1 min
511

आज रात्री बारापासूनच,

सगळ्यांचे फेसबुक,

व्हॉट्सॲपचे स्टेटस सजले


कुठे कविता, कथा, लेख,

अन् भारावल्या शब्दांनी,

कित्येक पानं भरले


वर्षभर तर आपलेच दिवस असतात,

चल ना एक दिवस देऊ या बायांना,

असं म्हणत शुभेच्छा देणारे उद्गार काढले


तरीही,

सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या बिछाना आवरेपर्यंत,

सगळ्याच कामांत तिलाच जुंपले


पुरुषांचे तर सोडाच,

पण आजही एका स्त्रीने,

दुसऱ्या स्त्रीशी वैरच साधले


दोन कौतुकसुमने उधळण्याऐवजी,

आजही तिला चुगलीतच बांधले

दिवस आता सरतच आला,

तिने आज पुन्हा त्याच आरशात पाहिले


नव्हतंच काही विशेष असं,

पण तिने रोजच्याच त्या तिलाच पाहिले

ओघळलेले दोन आसू,

स्वतःच अलगद टिपून घेतले


आज काय नि रोज काय,

सगळेच दिवस स्त्रियांचे,

अन् स्त्रियांचे सगळेच दिवस सारखेच,

असं म्हणत आजच्या दिवसाला नमन केले


Rate this content
Log in