STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

आज...!

आज...!

1 min
189

आज...!


आज दहा आणि नऊ

ची संध्या आणि काळ

आज बुध आणि वार

ची सायं आणि काळ...


खरच मजा वाटली

आठवण दाटली

साठी गाठली

आणि जुनी पाटी फुटली...


काळ बदलला

काळ बदलवला

काळ बाद केला

की काळ आला...


काही काही

कळले नाही

डोक्यात माझ्या तरी काही

तूर्त तरी काही शिरले नाही..


वाटते संगीता सारखेच

नवं नवे प्रयोग

माथी येऊन

बसतात काय..?


की नव्याच्या नादात

जुने घेऊन 

सारे पळून 

जातात काय...?


काही असलं

तरी आपली तोकडी मती

त्यात व्यवहारात तर

खुजी गती...


जे जे होतं

ते ते वयात पहायचं

हवं हवं म्हणून

नवं नवीन पुन्हा शिकायचं...


पाटी गेली,पेन्सिल गेली

वह्या गेल्या पुस्तक गेली

आता बोटाच्या टोकावर

दुनिया आली...


तरी पण

तो बोरू, तो टाक, ते पेन

ती पाटी, ती वही, ते पुस्तक

तो गिरवायचा कित्ता

ती टाईप रायटर आठवतो...


फळ्यावरच्या पांढऱ्या रंगीत

अक्षरांच्या ओळीत सुद्धा

जीव गुरुजींचा ओतलेला

अजूनही जाणवतो

अजूनही जाणवतो....!



Rate this content
Log in