आज विचार तो ....
आज विचार तो ....
काही बाकी आहेच नाही
जे मिळेल ते निघून जाईल
अश्रू कुठे थांबतात
हासू कुठे टिकतात
पुढे मागे चालणारे पाय ही थकतील
धावणारे मन कसे रोखशील
गाजावाजा कशाला
सर फुल घे हातात
दारात जाऊन उभा राहा
दरवाजा खुला होईल
बोलून टाक मनातल
मजाक करीन
थट्टा करीन
पण...
तुझ्यावर प्रेम खर करीन
हा बोली तर दिवाळी
आई बाबांना बोलवल तर दसरा
चुकुन भावाला बोलवले तर होळी
असू देना प्रेम हा रंगाचा सण होईल
गुलाबासारखा गाल लाल होईल
मारल तर तूला
रडू नको
खंबीर असा उभा रहा
तिच्या डोळ्यात बघ
शेवटच बोलतो सखे
दिल्या घरी सुखी राहा.
आरे हिम्मत तूझी गाजेल
मुलगी मनातल्या मनात लाजेल
विचार नाही पक्का
भेटल कसा धोका...
अस करून बघ प्रेम
मिळाली तर जिवन साती
नाही मिळाली तर विठ्ठल भक्ती
हे कोणी सांगितलं
धोका दिला तर पावशेर मारा
आठवणीत तीच्या झुर झुर झुरा
लागला दगड काळजात
तर धडपडत पडेल प्रेमात
विचार काय करतोयस
चार केस आहेत टाळूवर
उडून जातील वार्यावर
आज आज विचारतो म्हणून
शेवटी तीच्या लग्नात रडत जाशील
अक्षता वाटून परत येशील ...
