आज वाटते
आज वाटते
1 min
278
आज वाटते गवसले
क्षितिज या ओंजळीत
भास कसे उमटले
अलगद या आभाळात
क्षण जसे भुललेले
प्रितीच्या या मोहरात
आभास कसे जगलेले
गाव हरवली धुक्यात
आज फिरुनी भेटले
मागल्या त्याच वळणात
श्वास ते नेत्री तरळले
आसवांच्या या धुक्यात
आज सावलीत वसलीसे
गावे ग्रीष्मात उजाडलले
जिवात तृषणा जागलीसे
भाव सरी नयनी ओघळलेले...
