आज काल मैत्री झाली दोन
आज काल मैत्री झाली दोन
आज काल मैत्री झाली दोन
दिवसांची ती काय कामाची......!
ओळख करून घ्यायची
आपल्या मनातील सगळी
व्यथा सांगून बसायची........!
एखाद्याची श्रीमंती एकून
मनात कालवा कालव करून
ती पाहून डोळ्यात खुपयांची......!
आज रात्री व्यवस्था करतो बसायची
यांची त्यांची उनी दुनि काढायची
एखाद्याची टर उडवयाची.......!
भावा बस अशीं आरोळी ठोकायची
तुला थोडी आमच्या सोबत पियाची
नाही भावा नको सगळी मजा करायची
घे रे माझी शप्पथ कुणी नाहीं बोलणार
यांची खात्री माझ्या शब्दांची......!
बोल भावा तुला कोणती पियाची
दोन दिवसात झालेली मैत्रीची
चर्चा करताना मित्राला पाहिजे
ती मागणी करायची आपली गरज
भागली की दुसरीकडे जागा शोधायची.....!
आपली भानगड अशीं आपल्या पैशाची
नाहीं घेयाची दुसऱ्याच्या पैशात रुबाबात
पियाची सकाळी उतरली की ..….!
भावा जास्त झाली होती
आता नको भीती वाटती
माझ्या घरी काहीच नाही माहिती
पुढच्या आयुष्यात काय होणार
याची आजच्या पिढीला अक्कल
कुठे येती.......!
आज काल मैत्री झाली दोन
दिवसांची ती काय कामाची......
