STORYMIRROR

Piyush Lad

Others

4  

Piyush Lad

Others

आज हा ही एक प्रश्न..!

आज हा ही एक प्रश्न..!

2 mins
179

कधी वागशील माणसा तू माणसासारखा


कधी सोडशील मोह तो सट्टा जुगाराचा

मुलं तुझ्याकडे पाहतात आधारासारखी


कधी सोडशील माणसा रे मोह दारूचा 

मुलं वाट पाहतात फुलपाखरासारखी


आता तरी लाग तू मनापासून कामाला 

मुलं हिंडतील भविष्यात कुत्र्यासारखी


नको करू त्यांच्यासमोर आत्महत्येची तू बाब

जीवाचे रे त्यांच्या जणू तुकडे पडती


नको बुडू तू रे समुद्रामध्ये रे दुःखाच्या

परिवार उभा आहे तुझा किनाऱ्यावरती


असा देशील तूच जर धीर तो सोडून

त्यांचा धीर कुठे जावा कुणाच्या चरणावरती


जर विचार तू कर त्यांच्या भविष्याचा तरी

पंख तुटतील त्यांचे ती रे पाखरासारखी


नको धरु रे माणसा तू रे वाईट संगत 

तुझ्या मुलांकडे बघ तुला आदर्श मानती 


नको करू त्यांच्यासमोर बायकोला शिवीगाळ

तुझ्यासोबत मुलेही वाम मार्गाने रे जाती


बाप आला नाही अजून कसा मुले चिंतेत राहती

लक्ष्य तुझ्या जिवामध्ये डोळे वाटेत ठेवती


कसा आला नाही बाबा वाट सारे ते पाहती

माय माऊलीसमोर घर शिरावर घेती


युवा आहार तू अजून तुझ्या मुलांच्या पिढीचा 

का रे वागणूक तुझी वय संपल्यासारखी


नको तोडू धीर माझ्या मायमाऊलीचा तरी

तुझ्या साथीने ती आधी किती बलवान होती


तुझ्यामुळेच या दिवसाची सुरुवात होते 

कारे बायकोच्या सहनशक्तीचा अंत तू पाहसी


एक घराची रे आणली तू तुळस तोडून

तू रे तिला उपटून फक्त राहू दिली माती


अरे का हे पुन्हापुन्हा तू रे विसरून जातो 

एके काळी तुझ्या घराची रे लक्ष्मी ती होती


आधी म्हणाला तू तिला पाठवू संसाराचा गाडा 

वचन दिले तू हळूच हात हातात घेऊनी


थोडी लावली ताकद जणू गेला तू थकुनी 

दिला संसाराचा गाडा तिच्या हातात सोडुनी


डोळ्यात तू तिच्या किती विणले रे स्वप्नं

झाले उध्वस्त ते सर्व गेली आसवं राहुनी


आता तरी वाग माणसा तू माणसासारखा

करतो रे तुला मी आता एक विनवणी 


कर नव्याने सुरुवात तिला वचन देऊनी

हाकू संसाराचा गाडा पुन्हा हात हातात घेऊनी...!


Rate this content
Log in