आज दर्याला तुफान आयलय
आज दर्याला तुफान आयलय
वारा लयच घोंगावता शिडात घुसतोय वेडा
हेलकावे नावेला भारी ,नाव कशि नावाडी सांभाळी
काळ्या ढगांनी आभाळात केली गर्दि
मनात काहुर माजल भितीच
कोण तारेल माझी ही नाव ?
दर्या कवा होईल हा शांत ?
मेघानों बरसून जा रे ,
तुफाना या शांत करारे
नेईन नाव मी माघारी ,
भरून मास्याच्या राशी त्या भारी
देईन रानीला दिलाच्या ही भेट
गाईन दर्याला गान मी ऐक
मी कोलि दर्याचा ,दर्या माझा ह्यो बाप