STORYMIRROR

Tushar Chandrakant Mhatre

Others

3  

Tushar Chandrakant Mhatre

Others

आईपण

आईपण

1 min
11.7K

शरीराची नाळ तुटली, अंतरीची घडली

नव्या नात्याची वीण घट्टपणे जडली

तीचे तत्व आणि ‘स्व:’त्व दोन्ही विरून गेले

बाईपण जाऊन जेव्हा आईपण आले


लहानशा मुठीची पकड घट्ट दाटू लागली

अदृश्य बंधनातच मुक्ती वाटू लागली

स्वत:चे जगणे जेव्हा बाळासाठी झाले

बाईपण जाऊन जेव्हा आईपण आले


Rate this content
Log in