आईच्या छायेत
आईच्या छायेत
1 min
222
कसे विसरून दिन
गेले आईच्या छायेत..
वाटे का झालो मोठा रे ?
आज असा मी वयात !
छत मायेचा तो असा
नाही कुठली रे चिंता..
असे नेहमी पदर
शिरी तो रे सुखाचा..
बोट पकडूनी मी रे
जेव्हा होतो मी चालला..
कधी पडला तो मी रे
आईने तो संभाळला..
अंघोळ घालून मला
राजकुमार करायची..
राज बिंडा म्हणून ती
काळा टिका लावायची..
कसे पटकन गेले
दिवस ते बालपण..
बघता ते आले आज
अवघड हे जीवन..
पुन्हा आईच्या कुशीत
लहान होऊन शिरु..
बालमन माझे तसे
लाडका आईचा लेकरु..
