आईच्या छायेत
आईच्या छायेत
1 min
366
तिच्या हाती पाळण्याची दोरी
छायेत तिच्या संस्काराची शिदोरी
प्रेमाने खाऊ घालते भाकरी
जिव्हाळ्याने करते चाकरी
अमृतपान तिने करविले
मातीच्या या गोळ्याला
तिच्या छायेत घडविले
नाती जपायला तिने शिकविले
तिच्या छायेत वात्सल्याचा स्पर्श
शिकवला तिने जीवनाचा संघर्ष
घडविला तीने नागरिक आदर्श
जीवनात दिला तिने हर्ष
तिच्याजवळ जवळ परी कथेचा सागर
तिच्याजवळ मायेचे मोहर
तिचा छायेत ब्रम्हांडाचे सार
तिच्या पायाखाली स्वर्गाचे दार
