आईच्या छायेत
आईच्या छायेत
1 min
445
आई
वात्सल्यसिंधू माऊली
जशी विधात्याची सावली
घडवी आम्हां संस्काररुपी पदराखाली
आई
त्यागाची मूर्ती
लेकरांच्या सुखी आयुष्यासाठी
तन-मन-धन अर्पण करी
आई
तेवणारी ज्योती
सत्य-यशाच्या तेजोमय पथावरी
नेई आम्हां उत्कर्षाच्या वाटेवरी
आई
देतेस स्फूर्ती
आदर्श जीवन जगण्यापरी
करण्या दुःखाला सामना हर्षुनी
आई
विसरु कशी
मी कायमची ऋणी
जन्मोजन्मी जन्म घेईन तुझ्या उदरी
