आईच्या छायेत...!
आईच्या छायेत...!
1 min
259
आईच्या छायेत....!
आईच्या काखेत
आईच्या मायेत
आईच्या छायेत
सुख मोठे....
अजाण बालक
आईच चालक
तिचीच ओळख
मज लागे....
डोईवर उन्ह
येता सडेतोड
तीच मोडे खोड
उष्णतेची...
पदराची छाया
करी शिरावर
धरी उरावर
मायेपोटी...
जीवन सरते
मायेच्या छायेत
घेऊनी कवेत
जन्मोजन्मी....
तिच्या छायेची
अवीट हो गोडी
संकटांची खोडी
तीच मोडी...
म्हणून आईचा
आधार लागतो
ईश्वर असतो
तिच्यातच.....
आईच्या छायेत
नाही भय भीती
फुलते हो छाती
आपोआप.....!
