STORYMIRROR

Trupti Naware

Others

4  

Trupti Naware

Others

आईच्या छायेत

आईच्या छायेत

1 min
385

आई नावाची एक कथा

प्रत्येकाच्या आयुष्यात असते

पण ती जवळ असताना

तिला चाळायची सवडच नसते

तिच्यावरची प्रत्येक ओळ

मायेची ,प्रेमाची ,विश्वासाची असते

तिच्यातला प्रत्येक प्रसंग 

हळवा,देखणा अनुभवाची साक्ष असते

पण ही कथा कळायला 

तिला मनापासून वाचायचं असते

कारण प्रत्येक पानावरच्या 

तिच्या मजकूरात काहीतरी खास असते 

ही कथा बरेचदा वाचता 

वाचताच शिकवत असते

ती सोबत नसली की ओळ न् ओळ

तीची आठवत असते

कधीकधी तिलाही मायेनं गोंजारायचं असते

कधीकधी तिच्याशी प्रेमानं बोलायचं असते

आपल्यातली बालीशता खुप व्यस्त असते

पण आई नावाची कथा इतकी उदार असते

की मोठे झाल्यावरही आपल्याला 

काहीतरी ती देतच असते

सरता सरता ही कथा संपुच नये

असचं वाटत असते

कारण ,शेवटच्या पानावरच्या

शेवटच्या ओळीत एक वास्तववादी सत्य असते

आपल्या आयुष्याची जेव्हा कथा होते

तेव्हाच तिच्यातली व्यथा कळत असते

आणि हे सत्य स्विकारुन आयुष्य जगणे

हेच प्रत्येक आईच्या वाट्याला येत असते .!!!



Rate this content
Log in