आईच्या छायेत ' सल '
आईच्या छायेत ' सल '
आठव होते सदा सदाची
पहाताना रोजचं छबी तिची
व्याकूळ होऊन पुसतो मी अंतरीऊ
देवा का रे काढीली आठव लवकरी
झालो मोठे आपण कितीही
हवी तिची प्रेरणा सदाही
येते कधी उदासी मनांतरी
देवा का रे काढीली आठव लवकरी
स्थूल मूर्ती ती मध्यम उंची
भालावरती आठी जराशी
अन्नपूर्णा जणु ही अवतारी
देवा का रे काढीली आठव लवकरी
आला कधीही पांतस्थ जरी
परतला नाही रिक्त पोटी घरी
तृप्त केले तिने साऱ्यांना तरी
देवा का रे काढीली आठव लवकरी
वाटते कधी व्हावे बालकापरी
सोडुनी मोठेपण नीजावे तिज अंकी
पण कुसचं हरवली मायेची भारी
देवा का रे काढीली आठव लवकरी
कितीही रडलो आई आई जरी
अश्रु पुसाया नाही ती घरी
सत्य असे हे ' स्वामी तिन्ही जगाचा -
आईविना भिकारी.
