आईची माया
आईची माया
आई किती गं तुझी वेडी माया
दिवस रात्र झिजवती माझ्यासाठी तू तुझी काया
किती कष्टाने तू घाम गाळती
अनेक अडचणीतून मला पाळती
झाडागत तुझी माझ्यावर सावली
ममत्वाने भरुन आहे गं -हदय तुझं माऊली
आई तू म्हणजे दुधावरची साय
किती गाऊ गाथा तुझी गं माय
तुझ्या विना एक क्षण ही जगणे नाय
वासराला जशी गोठ्यातील गाय
माझ्या सुखासाठी किती करती गं तू श्रम
नाही फेडु शकत उपकार तुझे फिरली जरी धाम
तुझं प्रेम म्हणजे आई अमृतधारा
माझ्या आयुष्याचे तुझ्यावरच गं भार सारा
आई तू म्हणजे वात्सल्याचा झरा
क्षणोक्षणी माझ्यावर तुझा गं पहारा
माझ्या जीवनातली तू एकमेव सहारा
जशी सृष्टीला जगवते गगन आणि धरा
प्रेम ,ममता ,जिव्हाळा ,आपुल्कीची तू छाया
गगना परी तुझी गं माझ्यावर अफाट माया
