आईची माया
आईची माया
मायचं मायेन बोलणं
लयी ऐकावंसं वाटत
कोरड वरड काहीही दिल
तरी आमाले गोडच लागत
भलतीच चव तिच्या हाताले
बोलणं जणू ताज घोळलेलं मध
जगणं तीच शान्या सुरत्या सारखं
अभिमान सुदिक नाय त्याचा साधं
पोरगी व्हता व्हता बाईची
नाय जीन तीच सरळ
लय सोसून कष्ट शेवटले
व्हते ती एकदाची सबळ
लगीन व्हताच येतो
तिच्या अंगी मोठेपणा
पोटातच घालत रायते चुका
स्वभावतःच तिचा मनमोकळेपणा
पहिल्या वहिल्या कोरडी उलटीपासून
पोटातला हाडा मासाचा गोळा जपते
जन्माला घालण्या लेकराला
मरणाच्या येण्या कळा सोसते
लेकुरळवाणंपण, तरुणपण
पोरांना मर मर जीव लावते
शान करून कामाले लावते
एक दिस दोनाचे चार हात करते
हा हा म्हणता म्हातारी व्हते
थकती लपती मोडती कमरेतन
नातवंड खेळवती वट्याशी बसून
यम येताच दाराशी निरोप घेते जगातन
