STORYMIRROR

Anagha Kamat

Others

4  

Anagha Kamat

Others

आईबाबांचं ध्येय

आईबाबांचं ध्येय

1 min
153

आमच्या घरासमोर आहे विजेची तार 

त्यावर सुंदर चिमण्या बसतात चार 


दोन चिमण्या पिल्लांना भरवतात चारा 

झोके घेतात तारेवर, येतो जेव्हां वारा 


रोज सकाळी नेम त्यांचा, तारेवर बसायचा 

आईबाबा उडाल्यावर पिल्लांनी चिवचिवाट करायचा 


मांजर आमची हुशार भारी , पहातच त्यांना बसते 

कधी उडतात अन् कधी बसतात, टेहळणी सुरू असते 


आईबाबा खाली हिरवळीवर , सुळकांडी मारतात 

तारेवर बसलेल्या पिल्लांना , उडायला शिकवतात 


प्रत्येक आईबाबांचं मुलांचं भलं करणं हे ध्येय 

मग मुले देतील वा न देतील, त्यांना ह्याचं श्रेय 


आपल्या गोजिरवाण्या पिल्लांना, बाहेर नाही येऊ देत 

लगेच बसते आंत मांजर पिल्लांना मायेनं जवळ घेत .


Rate this content
Log in