STORYMIRROR

bhavana bhalerao

Others

4  

bhavana bhalerao

Others

'आई '

'आई '

1 min
472

तिला दुनियेतलं काही कळत नाही, 

तिच्या वाचुन आमचं काही अङत नाही. 

कुणी आला गेला की शोधून काढते ती, 

याचा त्याचा दुवा अन हरवत गेलेली नाती, 

विचारपुस करते कशी आहे पाऊस,माती. 


तिला दुनियेतलं काही कळत नाही 

तिच्या वाचुन आमचं काही अङत नाही 

पहाटे लवकर उठून करत बसते देवपुजा, 

आम्हाला ऐकायला लागते घंटीची सजा

घेतच नाही कधी ती कामातून रजा. 


तिला दुनियेतलं काही कळत नाही 

तिच्या वाचुन आमचं काही अङत नाही 

पै,पै जोडून पदरी सोननाण जमवते 

अङलनङल तेव्हा पदरचे पैसा हळुच कुठुन तरी काढते. 

विणकाम, तोरण अन शिलाई करुन तिच मन रमवते. 


तिला दुनियेतलं काही कळत नाही

तिच्या वाचुन आमचं काही अङत नाही 

अचानक गेली ती देवाघरी, 

सोङुन सगळं माघारी, 

कोण आता हाका मारुन उठवणार, 

दारात सङारांगोळी करणार..

सणावारात पंगती उठवणार, 

अङल नङल तर पदरात घेणार 

सगळं विसरून जवळ बोलावणार, 

माझी आई आता कोण होणार?


तिला दुनियेतलं काही कळत नाही 

तिच्या वाचुन आमचं काही अङत नाही 

एवढ मात्र खर की आईवाचुन

 दुनियेत माणुस काही घडत नाही 


Rate this content
Log in